कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगट याने शुक्रवारी आज काँग्रेसमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थित प्रवेश केला. या वेळी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, पक्षाचे नेते पवन खेडा, हरियाणा काँग्रेसचे उदयभान आणि हरियाणा प्रभारी दीपक बाबरीया उपस्थित होते.
बजरंग पुनिया यांना काँग्रेस संघटनेत योग्य पद दिले जाणार आहे. मात्र त्यांना तिकीट दिले जाणार नाही. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी मल्लिकार्जुन खरगे यांची त्यांच्या घरी सुमारे अर्धातास भेट घेतली.
काँग्रेस मध्ये आल्यावर विनेश फोगट म्हणाल्या, संपूर्ण देशवासीयांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार. नवी इनिंग सुरु करत आहे. असहाय्य आणि दुर्बल घटकांच्या महिलांच्या पाठीशी आम्ही आहोत.मी काँग्रेसचे आभार मानते. वाईट काळातच कोण आपले आहे आणि कोण परके हे कळते. देवाने मला देशाची सेवा करण्याची संधी दिली. आमची लढा सुरु आहे. खटला सुरु आहे. तिथेही आम्ही जिंकणार आहोत.
बजरंग पुनियाने देखील सर्वांचे आभार मानले. देशाच्या कन्येने उठवलेल्या आवाजाची किंमत आम्ही देत आहोत, असे ते म्हणाले. कुस्तीमध्ये जेवढी मेहनत घेतली आहे, तेवढीच मेहनत भविष्यातही करू. आमच्या संघर्षाच्या लढाईत काँग्रेस नेहमीच पाठीशी उभे राहील.या साठी आम्ही काँग्रेस पक्षाचे आभारी आहोत.