Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महिला सम्मान फक्त शब्दात नाही तर आचरणात देखील आणायला हवा-राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु

draupdi murmu
, शुक्रवार, 6 सप्टेंबर 2024 (12:50 IST)
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु म्हणाल्या की, महिला सम्मान फक्त शब्दात नाही तर आचरणात देखील आणायला हवा हे गरजेचे आहे. राष्ट्रपती यांनी गुरुवारी शिक्षक दिवस विशेष राष्ट्रीय शिक्षक सम्मान समारंभाला संबोधित केले. राष्ट्रपती म्हणाल्या की, सात्विक जीवनच वास्तवात यशस्वी जीवन आहे. ही गोष्ट मुलांना समजवून सांगणे ही महत्वाची जवाबदारी आहे.
 
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु या म्हणाल्या की, महिला सन्मान केवळ शब्दातच नाही तर आचरणात देखील आणावा. कोणत्याही समाजाचा विकास होण्यासाठी महिला या मदत करीत असतात. देशातील महिला स्वावलंबी व खंबीर बनत आहे. म्हणून शिक्षकांनी समजून घेऊन मुलांना चांगले शिकवून महिलांबद्दल आदर करण्यास शिकवावे.
 
गुरुवारी शिक्षक दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार सोहळ्यात मुर्मू बोलत होत्या. यावेळी त्यांनी देशातील 82शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित केले. तसेच शाळांमध्ये शिकवणाऱ्या 50शिक्षकांव्यतिरिक्त, उच्च शैक्षणिक संस्था आणि कौशल्य विकास संस्थांमध्ये शिकवणाऱ्या प्रत्येकी 16शिक्षकांचाही सहभाग करण्यात आला होता.

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगट आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार