यूपीच्या बलरामपूर जिल्ह्यातून अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे, जिथे विषारी साप चावल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर त्याच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी आलेल्या लहान भावालाही साप चावला आणि त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही वेदनादायक घटना तराई भागातील भवनियापूर गावातील आहे. जिथे दोन सख्ख्या भावांना साप चावला आणि त्यांचा मृत्यू झाला. तर एका नातेवाईकाची प्रकृती चिंताजनक आहे.
ठाणे लालिया भागातील भवनियापूर गावात राहणारे 38 वर्षीय अरविंद मिश्रा यांना 2 ऑगस्ट रोजी विषारी सापाने चावा घेतला होता. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेले, जिथे प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्याला बहराइचला रेफर केले. मात्र डॉक्टरांचे सर्व प्रयत्न करून ही अरविंदचे प्राण वाचवू शकले नाहीत आणि त्यांचा मृत्यू झाला.
भावाच्या मृत्यूची बातमी समजताच लुधियाना येथे राहणारा त्यांचा लहान भाऊ गोविंदही अंत्यसंस्कारासाठी घरी आला. अंतिम संस्कारानंतर गोविंद आणि नातेवाईक चंद्रशेखर पांडे घरीच राहिले. परंतु नियतीच्या मनात काही अजूनच होते. रात्री दोघेही घरात झोपले असताना त्यांनाही विषारी साप चावला, त्यानंतर त्यांची प्रकृतीही ढासळू लागली. कुटुंबीयांनी गोविंद आणि चंद्रशेखर यांना तातडीने रुग्णालयात नेले जेथे गोविंदचा मृत्यू झाला तर नातेवाईक चंद्रशेखरची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. गोविंद मिश्रा यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.