दिल्लीत यंदाही फटाक्यांच्या साठवण, विक्री आणि वापरावर बंदीचे आदेश केजरीवाल सरकारने दिले आहे.
दिल्ली सरकारने वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी फटाक्यांच्या उत्पादन, साठवणूक, विक्री आणि वापरावर 1 जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे. याबाबतचे निर्देश पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी दिले आहेत.
ते म्हणाले, बंदीची कडक अंलबजावणी करण्यासाठी दिल्ली पोलीस डीपीसीसी आणि महसूल विभाग यांच्या सहकार्याने एक योजना केली जाणार. प्रदूषणावर आळा घालण्यासाठी केजरीवाल सरकार 21 फॉक्स पॉइंट्सवर याआधारित कृती आराखडा तयार करत आहे.
दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी गुरुवारी त्यांच्या वक्तव्यात सांगितले की, "दिल्लीमध्ये प्रथमच, पर्यावरण विभाग थंडीच्या महिन्यांत हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी 21 कलमी हिवाळी कृती योजनेअंतर्गत प्रदूषणाच्या ठिकाणी हवेच्या गुणवत्तेचे वास्तविक वेळ निरीक्षण करण्यासाठी ड्रोन चा वापर करेल.
अशी माहिती पर्यावरण मंत्री गोपालराय यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच हिवाळी कृती आराखड्याअंतर्गत सविस्तर कृती आराखडा आणि सूचना 12 सप्टेंबर पर्यंत पर्यावरण विभागाकडे देण्याचा सूचना सर्व विभागांना दिल्या आहे.