Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अबब…! महिलेच्या पोटात सापडले चक्क लाटण

अबब…! महिलेच्या पोटात सापडले चक्क लाटण
आजकाल काय घडले हे काही सांगता येत नाही. अनेक चित्रविचित्र गोष्टी समोर येत असतात. अशीच एक विचित्र घटना उत्तराखंड घडली आहे. येथील एका महिलेच्या पोटात चक्क एक फूट लांब लाटणे आढळले आहे. हल्दानी मेडिकल कॉंलेजमध्ये डॉक्‍टरांनी एक जटिल शस्त्रक्रिया करून हे लाटण तिच्या पोटातून बाहेर काढले आहे.
 
नैनितालमधील हल्दानी येथील सुशीला तिवारी वैद्यकिय महाविद्यालयातील डॉक्‍टरांनी संबंधित महिलेची ओळख गुप्त ठेवण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. डॉक्‍टरांनी सांगितले की या महिलेला पोटात दुखत असल्याने तीन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान एक्‍स-रे आणि अल्ट्रासाऊंड रिपोर्टमध्ये या महिलेच्या आतड्यात गॅस असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र शस्रक्रिया करण्यात आल्यावर महिलेच्या पोटात लाटणे आढळले. हे पाहून डॉक्‍टरांना धक्का बसला. या प्रकाराबाबत डॉक्‍टरांनी लैंगिक अत्याचाराची शक्‍यता व्यक्त केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आयसीसी गोलंदाजीच्या क्रमवारीत अश्विन-जडेजा अव्वल!