बेंगळुरू: दोन तरूणींनी एकमेकांशी लग्न केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याच्या दुसर्याच दिवशी या दोघींपैकी एकीला नोकरीरून काढण्यात आले आहे. या तरूणींपैकी कमी वयाच्या तरूणीने सांगितले की मला सकाळी कार्यालयातून फोन आला आणि विचारणा झाली की मला नोकरी करायची आहे वा नाही. मी पालकांशी बोलून आपल्या घरी निघून जाण्याचा सल्ला कंपनीने दिला. मी वकिलांशी बोलते असे त्यांना सांगितले. नंतर सायंकाळी 5.30 वाजता कंपनीतून पुन्हा फोन आला की एचआरने मला नोकरीतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीला माहीत आहे की या दोघींपैकी एक मी आहे. मीडियात ही बातमी आली, हे चांगले झाले नाही, असे मला सांगण्यात आले.
या जोडीपैकी पती असणारी युवती म्हणाली, अशा पद्धतीने कोणाला नोकरीवरून काढणे चुकीचे आहे. टीव्हीवर दाखवण्यात येणार्या बातम्यांवरून ते जोडपे आम्हीच आहे हे ओळखले असे कंपनीचे म्हणणे आहे.