Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भय्यू महाराजांच्या हत्येची शंका, भक्तांनी केली सीबीआय चौकशीची मागणी

भय्यू महाराजांच्या हत्येची शंका, भक्तांनी केली सीबीआय चौकशीची मागणी
इंदूर- महाराष्ट्राहून मध्यप्रदेशातील इंदूर येथे पोहचून भय्यू महाराजांच्या अनुयायांनी त्यांच्या आत्महत्याचे प्रकरण सीबीआयकडे तपासाला देण्याची मागणी केली आहे.
 
भय्यू महाराजांच्या अनुयायांनी आरोप केला आहे की या प्रकरणाचा तपास व्यवस्थितपणे केला गेलेला नाही. अनुयायांनी इंदूरच्या डीआयजी हरिनारायणचारी मिश्र यांच्याकडे निवेदन केले आहे.
 
उल्लेखनीय आहे की 12 जूनला भय्यू महाराज यांनी आपल्या निवासावर स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली होती. पोलिस तपासणीत आत्महत्येमुळे मृत्यू झाला अशी माहिती दिलं गेली होती.
 
भय्यू महाराजांचे अनुयायांचे म्हणणे आहे की आम्हाला जीवनाचा अर्थ सांगणारे आत्महत्या करूच शकत नाही. अनुयायांची मागणी आहे की त्यावेळी त्यांच्या घरातील सर्व लोकांची सीबीआय तपासणी व्हायला हवी.
 
आश्चर्य म्हणजे भय्यू महाराजांच्या 'सूर्योदय आश्रम' येथे त्यांचे जवळीक आणि उत्तराधिकारी विनायक अनेक दिवसांपासून गायब आहे. त्यांच्या घरी त्यांची पत्नीदेखील दिसत नाहीये. ट्रस्टचे सचिव तुषार पाटील यांनी म्हटले की सीबीआय तपासणी केल्याने नक्कीच हैराण करणारे तथ्य समोर येतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठा आरक्षणासाठी कोर्टात लढाई