Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 4 April 2025
webdunia

मॅटर्निटी लिव्हवर मोठा निर्णय: महिलांना 9 महिन्याची मॅटर्निटी लिव्हमिळू शकते, नीती आयोगाचा प्रस्ताव

Big decision on maternity leave
, मंगळवार, 16 मे 2023 (11:36 IST)
Maternity leave : खासगी आणि सरकारी  क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नीती आयोगाच्या प्रस्तावानुसार आता महिलांना 9 महिन्याची प्रसूती रजा दिली जाऊ शकते. बाळंतपणाच्या सुरुवातीला गर्भवती महिलांना नवजात बाळाची काळजी घेण्यासाठी प्रसूती रजा (maternity leave) दिली जाते. नीती आयोगाचे सदस्य पीके पॉल म्हणाले की खाजगी आणि सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलां कर्मचाऱ्यांसाठी  प्रसूती रजेचा कालावधी सहा महिन्यांवरून आता 9 महिन्यांपर्यंत वाढवण्याचा विचार केला पाहिजे. पॉल म्हणाले खाजगी क्षेत्रात मुलांचे चांगले संगोपन करण्यासाठी क्रॅच शिशु गृह उघडले पाहिजे. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वांगीण काळजीसाठी यंत्रसामग्री उभारण्यासाठी निती आयोगाला खाजगी क्षेत्राने सहकार्य करावे. 
 
मातृत्व सुधारणा विधेयक 2016 हे 2017 मध्ये संसदेत मंजूर करण्यात आले ज्या अंतर्गत सशुल्क प्रसूती रजा पूर्वीच्या 12 आठवड्यांवरून 26 आठवडे करण्यात आली. ती फक्त सहा महिन्यांवरुन नऊ महिन्यांची प्रसूती रजा करण्यात येणार आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अहमदनगरमधील शेवगावमध्ये दोन गटात हिंसाचार, आतापर्यंत 31 जण ताब्यात