Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुजरातमध्ये भाजपच

गुजरातमध्ये भाजपच
, बुधवार, 25 ऑक्टोबर 2017 (12:12 IST)

सध्या गुजरातमध्ये राजकारण तापले आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतरची ही निवडणूक भाजपसाठी अग्निपरीक्षा ठरत आहे. त्यामुळेच होम ग्राऊंड टिकवण्यासाठी मोदींनी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. तर मोदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी राहुल गांधी झंझावाती प्रचार करत आहेत. आता निवडणूकपूर्व सर्वेक्षणांचे आकडे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. इंडिया टुडे समूह आणि अॅक्सिस माय इंडियाच्या सर्वेक्षणातून भाजपला गुजरातमध्ये दोन तृतीयांश जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

इंडिया टुडे समूह आणि अॅक्सिस माय इंडियाने २५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान सर्वेक्षण केले होते. यामधील आकडेवारीवरुन भाजपाला ११५ ते १२५ जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काँग्रेसला ५७ ते ६५ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला ११६ आणि काँग्रेसला ६० जागा जिंकण्यात यश आले होते. या सर्वेक्षणात १८,२४३ लोकांची मते विचारात घेण्यात आली असल्याचे इंडिया टुडे समूह आणि अॅक्सिस माय इंडियाने म्हटले आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तुमच्या पेक्षा तर सुरेश प्रभू चांगले होते