Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतातील फेसबुकची टीम राजकीय विचारांवर भेदभाव करते

भारतातील फेसबुकची टीम राजकीय विचारांवर भेदभाव करते
, बुधवार, 2 सप्टेंबर 2020 (08:22 IST)
भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांना पत्र लिहून मोठे आरोप केले आहे. भारतातील फेसबुकची टीम राजकीय विचारांवर भेदभाव करत असल्याचा आरोप त्यांनी पत्राद्वारे केला आहे.
 
“फेसबुकची भारतातील टीम राजकीय विचारांच्या आधारे भेदभाव करत आहे. फेसबुकचे कर्मचारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ज्येष्ठ केंद्रीय नेत्यांप्रती अपशब्दांचा वापर करतात. तसंच आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार फेसबुकचे भारतील कर्मचारी एका विशिष्ठ राजकीय विचारांचे आहेत,” असं रविशंकर प्रसाद यांनी पत्रात नमूद केलं आहे.
 
२०१९ च्या निवडणुकीपूर्वी फेसबुक इंडिया व्यवस्थापनाने उजव्या विचारसरणीच्या समर्थकांचे फेसबुक पेज हटवले किंवा त्यांची पोहोच कमी केली, असंही प्रसाद यांनी पत्रात नमूद केलं आहे. “फेसबुकनं निष्पक्ष असायला हवंअसंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

OPERATION BRAHMPURI पुरात अडकलेल्या लोकांचे भारतीय सेनेने वाचवले प्राण, बघा फोटो