Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उपराष्ट्रपती पदासाठी भाजपतर्फे सुरेश प्रभू यांना उमेदवारी?

suresh prabhu
, शुक्रवार, 8 जुलै 2022 (14:55 IST)
माजी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांना उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपकडून रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. सुरेश प्रभू हे शिवसेनेचे माजी खासदार आहेत. या पार्श्‍वभूमीवर दिल्लीमध्ये सुरेश प्रभूंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत चर्चा केली. यानंतर याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
 
काही दिवसांपूर्वीच प्रभू यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपला. त्यांनी निवडणुकींच्या राजकारणातूनही निवृत्ती घेतली आहे. सुरेश प्रभू यांनी 1996 मध्ये राजापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर पहिल्यांदा निवडणूक लढविली. 1998, 1999 या सालच्या लोकसभा निवडणुकीतही ते विजयी झाले. 1998 साली अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये ते वने व पर्यावरण खात्याचे मंत्री होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली सुरेश प्रभू यांना राज्यसभेची उमेदवारी देत त्यांना भाजपमध्ये आणत सर्वांनाच धक्का दिला.
केंद्र सरकारमध्ये वाणिज्य मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, नागरी उड्डाण मंत्रालय अशा महत्त्वांच्या खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे माजी खासदार म्हणून आता भाजप उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही सुरेश प्रभू यांना रिंगणात उतरवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रेयसीच्या विरहामुळे 18 वर्षीय प्रियकराची आत्महत्या