दिल्लीतील गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी भाजपचे सरचिटणीस तरुण चुग आणि जम्मू-काश्मीरचे एलजी मनोज सिन्हा यांच्यासोबत सुरू असलेली बैठक संपली आहे. भाजपने जम्मू-काश्मीरमधील उमेदवारांची पहिली सुधारित यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत पहिल्या टप्प्यातील 15 उमेदवारांचीच नावे जाहीर झाली आहेत.
भाजपच्या पहिल्या यादीत जम्मू-काश्मीर विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री निर्मल सिंह आणि माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता यांसारख्या अनेक दिग्गज नेत्यांच्या नावांचा समावेश नव्हता. जम्मू-काश्मीर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांनाही पक्षाने पहिल्या यादीत स्थान दिले नव्हते.
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली सुधारित यादी जाहीर केली आहे. पहिल्या टप्प्यातील 15 उमेदवारांचीच नावे या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. ही दुरुस्ती केल्यानंतर जाहीर केलेली पहिली यादी मानली जाईल.या यादीत ज्या उमेदवारांची नावे आली आहेत, त्यांना त्या-त्या मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.
भाजपने पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी 15 जागांवर, दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी 10 जागा आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी 19 विधानसभा जागांवर 44 उमेदवारांच्या पहिल्या यादीत आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत