Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केरळमध्ये बोट बुडाल्याने 21 लोकांचा मृत्यू, महिला लहान मुलांचा समावेश

boat
, सोमवार, 8 मे 2023 (08:51 IST)
केरळमधील मल्लापुरम जिल्ह्यात तुवलीथीरम बीच जवळ 30 प्रवाशांना घेऊन जाणारी एक हाऊसबोट बुडाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 21 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे.
 
एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार क्रीडा मंत्री व्ही.अब्दुरहिमान म्हणाले की विविध रुग्णालयांमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे 21 लोकांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. यात अनेक महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. शाळेला सुट्ट्या लागल्याने अनेक लोक सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी बोटीची सफर करत होते.
 
“अनेक पीडित बोटीत अडकले होते आणि त्यांना बाहेर काढण्यात येत आहे. बोट उलटल्याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलीस अधिक तपास करीत आहेत.” अशी माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून पीडितांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
Published By -Smita Joshi 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

माझ्या हृदयात फक्त विठ्ठलाचे स्थान शरद पवारांची प्रतिक्रिया