Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 18 April 2025
webdunia

राजस्थान : लोक झोपडीत जेवणासाठी बसले होते, तेवढ्यात ऑडी कार घुसली, एकाचा मृत्यू, 9 जखमी

bolero
, मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021 (18:46 IST)
राजस्थानमध्ये मंगळवारी एक मोठा रस्ता अपघात झाला. जोधपूरमध्ये एक अनियंत्रित ऑडी कार एका झोपडीत घुसली. यामुळे एकाचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी झोपडीत उपस्थित अन्य 9 जण जखमी झाले. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, एम्स रोडवर सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात झाला त्यावेळी लोक झोपडीत जेवणासाठी बसले होते. मात्र त्यानंतर भरधाव वेगात आलेल्या कारने झोपडीत घुसून मृत्यूला कवटाळले.झोपडीत जाण्यापूर्वी कारने दुचाकीस्वार व स्कूटीलाही धडक दिल्याचे वृत्त आहे. घटनेनंतर लोकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून चालकाला ताब्यात घेतले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चीनने LAC वर गाव वसवले, ही जमीन 1959 मध्ये भारताकडून बळकावली होती