Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ममता सरकाराला न्यायालयाचा झटका

ममता सरकाराला न्यायालयाचा झटका
मोहरमच्या दिवसासह सर्व दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत दुर्गा विसर्जन करण्याची परवानगी देत कोलकता हायकोर्टाने मुख्यंमत्री ममत बॅनर्जी यांच्या सरकाराला जोरदार चपराक लगावली आहे. दुर्गा विसर्जन मोहरमनंतर करा, असा आदेश ममता सरकाराने पश्चिम बंगलासाठी काढला होता. त्याविरोधात जनहित याचिकेवर कोलकता हायकोर्टाने हा निर्णय घेतला.
 
या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी दुर्गा विसर्जन आणि मोहरमचा ताझिया यांचे मार्ग निश्चित करा, असे निर्देश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत. सुनावणीदरम्यान कोलकता हायकोर्टाने पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांच्या सरकारावर ताशेरे ओढळे आहेत.
 
हायकोर्टाने सांगितले की सरकार अशाप्रकारे लोकांच्या श्रद्धेत दखल देऊ शकत नाही. कोणत्याही आधारशिवाय सरकार म्हणून असलेल्या ताकदीचा वापर करू नका.
 
हायकोर्टाने म्हटले सरकारकडे अधिकार आहेत, पण अमार्यद नाहीत. कोणत्याही आधाराविना आपल्या ताकदीचा वापर करणे चुकीचे आहे. शेवटच्या पर्यायाचा विचार शेवटीच व्हायला हवा, बुधवारीदेखील कोर्टाने या मुद्यावरून ममता सरकारला फटकारले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IND Vs AUS : कुलदिप यादवची हॅट्रिक