Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 30 March 2025
webdunia

महाकुंभात स्नान करणाऱ्या महिला व मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

crime
, शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2025 (14:50 IST)
महाकुंभात आलेल्या महिलांचे स्नान करतानाचे आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करुन त्यांची विक्री करणाऱ्या दोन सोशल मीडिया अकाउंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाकुंभात आलेला महिला व मुलींचे स्नान करताना व कपडे बदलतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्याचे तपासात समोर आले असून हा महिलांच्या गोपनीयतेचे आणि प्रतिष्ठेचे  उल्लंघन असल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
17 फेब्रुवारी रोजी एका इंस्टाग्राम अकाउंटविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अकाउंटवरून महिलांचे स्नान करतानाचे आणि कपडे बदलतानाचे आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केले जात होते. कंपनीकडून ती चालवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी माहिती घेतली जात आहे. बुधवारी एका टेलिग्राम चॅनेलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ALSO READ: रील्स बनवण्याचा छंद बनला मृत्यूचे कारण, दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
महाकुंभमेळ्याबाबत सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या पोस्ट टाकण्याच्या 10 प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या 101 खात्यांवर पोलिसांनी आतापर्यंत कारवाई केली आहे.
महाकुंभाच्या सुरुवातीपासून, विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अफवा पसरवणाऱ्या 101 अकाउंट्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited By - Priya Dixit 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्र तापला! अनेक जिल्ह्यांमध्ये वाढत्या तापमानाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले