Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Chandrayaan 3: चांद्रयान-3 मिशनचा नवीन व्हिडिओ समोर आला, पहा रोव्हर प्रज्ञान लँडरमधून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले

chandrayaan 3 rover landed on moon
, शुक्रवार, 25 ऑगस्ट 2023 (13:52 IST)
चांद्रयान-३ मोहिमेच्या यशानंतर संपूर्ण जग भारताच्या विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरकडून येणाऱ्या माहितीची आतुरतेने वाट पाहत आहे. भारताची स्पेस एजन्सी ISRO देखील मिशनशी संबंधित अपडेट वेळोवेळी शेअर करत असते. दरम्यान, एजन्सीने X वर आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये चांद्रयान-3 चा रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना दिसत आहे.
इस्रोच्या नवीन व्हिडिओमध्ये प्रज्ञान रोव्हर लँडरमधून बाहेर पडताना आणि उतारावर हळूहळू उतरल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावर चालताना दिसतो. इस्रोने सांगितले की, हा व्हिडिओ 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर विक्रमच्या यशस्वी लँडिंगनंतरचा आहे. 
 
यापूर्वी इस्रोने 24 ऑगस्ट रोजी एक व्हिडिओही शेअर केला होता. यामध्ये इस्रोने सांगितले की, लेंडरच्या केमेऱ्याने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यापूर्वी फोटो काढले आहे. 
इस्रोने ट्विट करत सांगितले आहे की, "सर्व क्रियाकलाप वेळापत्रकानुसार आहेत. सर्व प्रणाली सामान्य आहेत. लँडर मॉड्यूल पेलोड्स ILSA, RAMBHA आणि ChaSTE ने आज ऑपरेशन्स सुरू केल्या आहेत. रोव्हर मोबिलिटी ऑपरेशन्स सुरू झाल्या आहेत." इस्रोने माहिती दिली की प्रोपल्शन मॉड्यूलवरील शेप पेलोड रविवारी चालू करण्यात आला. RAMBHA आणि ChaSTE आज कामाला लागले आहेत. रोव्हर मोबिलिटी ऑपरेशन्स सुरू झाल्या आहेत."
 
लँडर 'विक्रम' आणि रोव्हर 'प्रज्ञान' घेऊन जाणारे 'लँडर मॉड्यूल' चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या सॉफ्ट-लँड केले. याद्वारे, ही कामगिरी करणारा भारत हा चौथा देश बनला आणि पृथ्वीच्या एकमेव नैसर्गिक उपग्रहाच्या अज्ञात दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरला.
 
 





 Edited by - Priya Dixit 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Chndrayan -3: चंद्रयान सुरक्षितपणे चंद्रावर उतरल्यावर बाळाचे नाव चांद्रयान ठेवले