Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बत्तीगुल' प्रकरणामागे चीनचा हात, गृहमंत्र्याची माहिती

बत्तीगुल' प्रकरणामागे चीनचा हात, गृहमंत्र्याची माहिती
, सोमवार, 1 मार्च 2021 (21:31 IST)
मुंबईत १२ ऑक्टोबर २०२० रोजी अचानक वीज गेली होती. यामागे चीनचा हात होता, ही धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याविषयी माहिती दिली आहे. या 'बत्तीगुल' प्रकरणाचा तपास सायबर सेलकडे देण्यात आला होता. या तपासाचा सायबर सेलने अहवाल गृहविभागाला सादर केला आहे. हा अहवाल गृहविभागाने ऊर्जा विभागाला सादर केला आहे.
 
रेकॉर्डेड फ्यूचर अॅनलिसिस या अमेरिकन कंपनीने याचा तपास केला होता. मुंबईच्या वीज यंत्रणेत मॉलवेअर घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं या कंपनीने म्हटलं असल्याचं, अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. हा सायबर हल्ला आहे का? याची चौकशी करावी, अशी विनंती ऊर्जा विभागाने केली होती.
 
या अहवालात हा सायबर हल्ला असू शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ८ जीबी डाटा फॉरेन अनअकाऊंटमधून MSEBमध्ये ट्रान्स्फर झालेला असू शकतो. लॉगइन करण्याचा प्रयत्न झाला असू शकतो, असं अहवालात म्हटलं आहे. १४ ट्रोजन हार्सेस सर्व्हरमध्ये टाकले असावेत, असं अहवालात म्हटलं आहे. आमच्या तपासात आलंय काही परदेशी कंपन्यांनी MSEB च्या सर्व्हेरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रेल्वे तिकीट अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन बुक करणे झाले सोपे जाणून घ्या