Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा : यंदाची होळी खेळाल तर कोरोना वाढीसाठी आमंत्रण

आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा : यंदाची होळी खेळाल तर कोरोना वाढीसाठी आमंत्रण
, सोमवार, 1 मार्च 2021 (14:35 IST)
नागरिकांनी खबरदारी न घेता यंदाच्या होळीत रंग खेळणे ही बाब कोरोनावाढीसाठी आमंत्रण देणारी ठरेल, असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि जम्मू-काश्मिरमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांचा हा सल्ला महत्त्वाचा मानला जात आहे.
 
दिल्लीत सुमारे 35 दिवसांनंतर एका दिवसात सर्वाधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत. सध्याच्या स्थितीत भारतीयांचे सामाजिक मेळावे किंवा जाहीर सभा आोजितकरणे योग्य नाही. तसेच देशात कोरोनाचा नवीन स्ट्रेनही समोर आल्याचे मत त्यांनी मांडले आहे. विशेषतः होळीच्या वेळी जर निष्काळजीपणा दाखवला तर येत्या काही दिवसांत रुग्णसंख्येत खूप मोठी वाढ होऊ शकते. यामुळे अशा परिस्थितीत आपण सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर राहिले पाहिजे. कारण या काळात सोशल डिस्टन्सिंगपाळले जात नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. होळीच्या काळात सध्याच्या तुलनेत अनेक पटीने रुग्ण वाढू शकतात. यामुळे प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन नागरिकांनी करणे गरजेचे आहे. खुल्या मनाने नागरिकांचे स्वागत करा, पण हात मिळवणे आणि मिठी मारण्यापासून टाळण्याचे आवाहन केले आहे.
 
नवीन स्ट्रेन अतिशय संसर्गजन्य 
महाराष्ट्र, केरळ आणि तेलंगणासह 18 राज्यांमध्ये ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमधील कोरोनाच्या नवीन स्ट्रेनचे जवळपास 200 रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचे नवीन स्ट्रेन हे अतिशय संसर्गजन्य आहेत. त्यामुळे याचा प्रादुर्भाव वेगाने होतो. पण ते किती जीवघेणे आहेत, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लूट लिया रे... गाडीत पेट्रोल टाकवल्यानंतर अंगावर कपडेही नव्हते