केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. तसंच परीक्षा घेण्याबाबत नियमावली देखील जाहीर करण्यात आली आहे. सीबीएसई, आयसीएसईसह अनेक राज्यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्याबाबत परवानगी मागितली होती. त्यानुसार केंद्र सरकारने राज्य शैक्षणिक मंडळ, सीबीएसई, आयसीएसई आदी मंडळांना परीक्षा घेण्यास सशर्त परवानगी दिली आहे. या संदर्भतील पत्र केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्यांच्या सचिवांना पाठवलं आहे.Taking into consideration the academic interest of large number of students, it has been decided to grant exemption from the lockdown measures to conduct Board examination for classes 10th & 12th, with few conditions like social distancing, face mask etc, for their safety. pic.twitter.com/P4ULsmbPVv
— Amit Shah (@AmitShah) May 20, 2020