Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Congress Bharat Jodo Yatra : नेत्याचे हृदयविकाराने निधन

webdunia
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 (13:22 IST)
Congress Bharat Jodo Yatra : नांदेडमध्ये राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू असताना काँग्रेस (Congress)  नेत्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या दुर्देवी घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त केली

कृष्ण कुमार पांडे हे मूळ नागपुरचे असून काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस होते. प्राप्त माहितीनुसार, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची यात्रा नांदेडमध्ये आल्यानंतर पांडे यांनी यात्रेच्या झेंडा तुकडीचे संचालन केले. यादरम्यान, पांडे यांना श्वास घेण्याचा त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात जाण्यापूर्वी वाटेतच पांडे यांचा मृत्यू झाला होता.
Edited by : Smita Joshi

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एकनाथ शिंदेंनी सर्व समर्थक आमदारांना मुंबईत बोलावलं