Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला

भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला
, गुरूवार, 30 जानेवारी 2020 (16:28 IST)
भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. केरळमध्ये हा रुग्ण आढळला आहे. हा तरुण चीनमधील हुआन विद्यापीठात शिक्षण घेत होता. भारतात परतल्यानंतर त्याची तपासणी केली असता तो पॉझिटिव्ह आढळला. सध्या त्याला रग्णालयात डॉक्टरांच्या देखेरेखेखाली ठेवण्यात आलं असून प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.
 
कोरोना व्हायरसची साथ पसरण्यामध्ये चीनमधील हुबेई प्रांताची राजधानी हुआन मुख्य केंद्र आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरातील १७० जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून हुबेई प्रांतातील ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. व्हायरस वेगाने पसरू लागल्यानंतर भारतीय सरकारने हुआन येथे असणाऱ्या २५० भारतीयांना मायदेशी आणण्याचा निर्णय घेतला. दरम्यान चीनमधून परतणाऱ्या सर्व भारतीयांची विमानतळावर तपासणी केली जात आहे.
 
चीनमध्ये २७ भारतीय अडकले असून यामध्ये महाराष्ट्रातील सात जणांचा समावेश आहे. हे विद्यार्थी पुणे, पिंपरी चिंचवड, लातूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेडमधील येथील आहेत. ही मुलं युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजीमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईकरांनी बालहट्टच पुरवायचे का, भाजपचा टोला