Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'म्हणून' भारतात पॅरासिटामॉलच्या किंमतीत ४० टक्के वाढ

'म्हणून' भारतात पॅरासिटामॉलच्या किंमतीत ४० टक्के वाढ
चीनमध्ये करोना विषाणूचे पडसाद आता भारतात जाणवत आहेत.चीनमधुन पुरवठा खंडीत झाल्याने भारतात पॅरासिटामॉल औषधांच्या किंमतीत जवळपास ४० टक्के वाढ झाली आहे.
 
जायडस कॅडिला कंपनीचे चेअरमन पंकज पटेल यांनी सांगितले आहे की, जंतु संसर्गाच्या उपचारासाठी वापरली जाणारी एंटीबायोटीक एजिथ्रोमाइसीनच्या किंमती ७० टक्क्यांनी वाढल्या आहेत. जर पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चीनमधुन पुरवठा सुरळीत झाला नाही तर संपूर्ण फार्मा इंडस्ट्रीत इंग्रिडिएंट्सचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.
 
अॅक्टिव फार्मास्युटिकल्स इंग्रिडिएंट्स (एपीआय) च्या आयातीसाठी भारत मोठ्याप्रमाणवर चीनवर अवलंबून आहे. कोणत्याही औषधाच्या निर्मितीसाठी एपीआय महत्वाचा घटक आहे. डायरेक्ट्रेट जनरल ऑफ कमर्शिअल इंटेलिजंस अॅण्ड स्टॅस्टिक्सनुसार २०१६-१७ मध्ये भारताने एपीआय गटात तब्बल १९ हजार ६५३.२५ कोटी रुपयांची आयात केली. यामध्ये चीनचा हिस्सा ६६.६९ टक्के होता. तर २०१७-१८ दरम्यान भारताची आयात २१ हजार ४८१ कोटी रुपये होती. ज्यामध्ये चीनचा हिस्सेदारीत वाढ होऊन ती ६८.३६ टक्के झाली होती. २०१८-१९ मध्ये एपीआय आणि ठोक प्रमाणातील औषधींच्या आयातीचे प्रमाण २५ हजार ५५२ कोटी रुपये झाले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्रात NPR प्रक्रिया थांबवणार नाही: उद्धव ठाकरे