rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

यूपीच्या गोंडामध्ये सिलिंडरचा स्फोट, दोन घरे कोसळल्याने 8 ठार

cylinder blast
गोंडा , बुधवार, 2 जून 2021 (10:05 IST)
उत्तर प्रदेशातील गोंडा येथे सिलिंडरच्या स्फोटात दोन घरे कोसळली. या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आणि बरेच जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आधी सात जणांच्या मृत्यू झाल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे आणि नंतर एका मुलाचा मृतदेह ढिगार्यातून बाहेर काढण्यात आला.
 
सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, कोसळलेल्या भागातून 15 लोकांना बाहेर काढले गेले, त्यातील 8 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये चार मुले, दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. अजूनही ढिगाऱ्याखाली अधिक लोक अडकल्याची भीती आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरामध्ये सिलिंडरचा स्फोट कोसळल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे. पोलिस पथक अजूनही घटनास्थळी हजर आहे. मदत व बचावकार्यही सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

यंदा सरासरीच्या १०१ टक्के पाऊस, राज्याची स्थिती जाणून घ्या