Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू

fire
, सोमवार, 29 जानेवारी 2024 (10:59 IST)
उत्तर प्रदेशातील बरेली येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. फरीदपूर शहरात एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू  झाला. मृतांमध्ये एक जोडपे आणि त्यांच्या तीन चिमुकल्या  मुलांचा समावेश आहे. एका खोलीत पाच जण झोपले होते. रविवारी पहाटे घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. खोलीला बाहेरून कुलूप असल्याचे सांगण्यात आले. यावरून खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस तपास करत आहेत.अजय गुप्ता उर्फ टिंकल (36),अनीता गुप्ता (34),मुलगा दिव्यांश (9) ,मुलगी दिव्यंका (6)  मुलगा दक्ष (3) अशी मयतांची नावे आहेत. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, अजय गुप्ता उर्फ ​​टिंकल हा मिठाईचा व्यवसाय करत होता. फरीदपूर येथील मोहल्ला फराकपूर येथे एका नातेवाईकाच्या घरात तो आपल्या कुटुंबासह तीन वर्षांपासून भाड्याने राहत होता. शनिवारी रात्री सर्वजण एकाच खोलीत झोपले. पहाटे घरातून धूर येत असल्याचे शेजाऱ्यांना दिसल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. खोलीचा दरवाजा बाहेरून बंद करून कुलूप असल्याचे सांगण्यात आले. दरवाजा बंद करण्यासाठी आत कडी  नव्हती. 
 
खोलीत पाचही मृतदेह जळालेल्या अवस्थेत पडलेले होते. खोलीतील सर्व सामान जळून खाक झाले. हे दृश्य इतकं भीषण होतं की लोकांचा जीव हादरला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले. घटनेची माहिती मिळताच मृताचे कुटुंबीय व नातेवाईक पोहोचले. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. 
 
पोलीस घटनास्थळी पोहोचले. आग कशी लागली याचा संपूर्ण तपास करण्यात येत आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहेत
 
 
 Edited by - Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फ्रान्समध्ये 'मोनालिसा'च्या चित्रावर फेकले सूप