Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Delhi : तरुणाची किरकोळ वादातून चाकूने वार करत हत्या

murder knief
, शुक्रवार, 12 ऑगस्ट 2022 (17:44 IST)
दक्षिण दिल्लीतील मालवीय नगरमध्ये एका २५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.गजबजलेल्या बाजारात एका तरुणाचा रस्त्याच्या मधोमध चाकूने वार करून खून करण्यात आला.ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.मृत व्यक्तीने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले होते.मयंक असे त्याचे नाव आहे.सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार-पाच जणांनी मयंकला घेरून धक्काबुक्की केल्याचे आणि जमाव प्रेक्षक म्हणून उभा असल्याचे दिसत आहे.. त्यानंतर आरोपी पळून गेले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, 11 ऑगस्ट रोजी मालवीय नगर भागात 25 वर्षीय मयंक आपल्या मित्रासोबत बसला होता.त्यानंतर त्याचा चार-पाच जणांशी कशावरून वाद झाला.त्यांनी मयंक आणि त्याच्या मित्रांवर दगडफेक केली.ते जीव मुठीत घेऊन पळून गेले.यानंतर आरोपींनी मयंकचा पाठलाग करत मालवीय नगर येथील डीडीए मार्केट गाठले.त्यांना घेराव घालून बाजारातच मयंकवर चाकूने सपासप वार केले.
 
सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे की आरोपी मुले मयंकवर चाकूने कसे सतत वार करत आहेत आणि तिथे उभे असलेले लोक मूक दर्शक होऊन बघत आहेत.त्यांना कोणीही रोखण्याचा प्रयत्न केला नाही.मयंकचा मृत्यू होऊन आरोपी पळून गेले.उपस्थित लोकांच्या मदतीने मित्रांनी मयंकला एम्समध्ये दाखल केले.जिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असला तरी आरोपी अद्याप अटकेपासून दूर आहेत.गजबजलेल्या परिसरात खून करून आरोपी निघून गेले आणि त्यांना कोणीही मध्यस्थी किंवा रोखले नाही, हा मोठा प्रश्न आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जॉन्सन अँड जॉन्सन टाल्कम पावडर आता कायमची हद्दपार होणार