Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अबब रुग्णाच्या पोटातून पाच किलो 'साहित्य' काढले

अबब रुग्णाच्या पोटातून पाच किलो 'साहित्य' काढले

मध्यप्रदेशातील एका  शस्त्रक्रियेत रुग्णाच्या पोटातून दाढी करायच्या ब्लेडची पाती, काचा, साखळी, असे 5 किलो वजनाचे लोखंड काढण्यात आले आहे.  सतना जिल्ह्यातील सोहोवाल गावातील 32 वर्षांच्या महंमद मकसूद नावाच्या रुग्णाच्या पोटात असह्य वेदना सुरू झाल्या. त्यामुळे त्याला शेजारच्या रेवा जिल्ह्यात उपचारासाठी पाठवण्यात आले. रेवा जिल्ह्यातील संजय गांधी रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे त्याला तपासणीसाठी आणल्यावर डॉक्टर प्रियांक शर्मा यांनी त्याच्या तपासणी केली व एक्स-रे काढले. त्यानंतर डॉ. शर्मा यांच्यासह सहा डॉक्टरांच्या चमूने त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. या रुग्णाच्या पोटात 263 नाणी, काचा, दाढीची ब्लेड्स, साखळी असे पाच किलो 'साहित्य' सापडले.

डॉ. शर्मा यांच्या मते या रुग्णाची मानसिक स्थिती नीट नव्हती, या वस्तू त्याने कुणाचेही लक्ष नसताना गुपचूप गिळंकृत केल्या आहेत. रेवाला आणण्यापूर्वी त्याच्यावर सतना येथे सहा महिने उपचार झाले होते पण तेथे त्याच्या प्रकृतीला आराम मिळाला नव्हता.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्मार्टफोनद्वारे मधुमेह नियंत्रित करणे शक्य