राजधानी दिल्लीसह आसपासच्या शहरांमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसले आहेत. यावेळी लोक घराबाहेर पडले. अद्याप कोणतीही अप्रिय बातमी आलेली नाही. दुपारी 4.16 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.
या महिन्यात दुसऱ्यांदा दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री भूकंप झाला, ज्यामध्ये सुमारे 150 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ आहे, ज्याचे धक्के दिल्ली-एनसीआरपर्यंत जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.6 इतकी होती.
भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. भूकंपाच्या जोरदार धक्क्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली होती. भूकंपाची तीव्रता इतकी होती की लोक घराबाहेर पडले आणि रस्त्यावर आले. भूकंपाचे धक्के काही सेकंदांसाठी जाणवले.
सोमवारी दुपारी 4.16 वाजता दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपानंतर लोक घराबाहेर पडून मोकळ्या जागेकडे जाताना दिसले. दिल्लीला लागून असलेल्या नोएडा, फरिदाबाद, गुरुग्राम आणि गाझियाबादमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.
नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. गेल्या शुक्रवारीच नेपाळमध्ये भूकंपाने मोठी हानी केली होती.