Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इरॉस थिएटर अखेर सील

इरॉस थिएटर अखेर सील
मुंबईतलं सर्वात प्रसिद्ध आणि जुने असलेले आयकॉनिक इरॉस थिएटर अखेर सील करण्यात आले आहे . ज्या खंबाटांच्या मालकीचं इरॉस थिएटर आहे, त्यांनी कर्मचाऱ्यांचा शंभर कोटींचा पगार थकवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. प्रशासनानं आणि सरकारनं वेळोवेळी सूचना देऊनही थिएटर कर्मचाऱ्यांना पगार दिला गेला नाही म्हणून अखेर इरॉस थिएटर सील करण्यात आल आहे. या थियेटर वरून अनेक दिवसा पासून मोठा वाद होता.
 
यामध्ये मुंबई येथे 1938 साली इरॉस थिएटर सुरु झालं होत. तर ऐकूण 78 वर्षानंतरही इरॉस मुंबईकरांमध्ये प्रसिद्ध खंबाटांच्या मालकिचं आहे इरॉस थिएटर आहे.तर यामध्ये एकूण असे खंबाटा एव्हीएशन अशी आणखी एक कंपनी ज्यात 2700 कर्मचारी काम करतात आहे. तर गेल्या वर्षभरापासून खंबाटा एव्हीएशनच्या कर्मचाऱ्यांचा पगार थकला आहे. त्यामुळे अनेक मोठे वाद निर्माण झाले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ट्रकखाली झोपलेल्या क्लिनरचा चाकाखाली चिरडून मृत्यू