Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रॅक्टिशनर्सची या तारखेला होणार परीक्षा

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रॅक्टिशनर्सची या तारखेला होणार परीक्षा
राष्ट्रीय सीमा शुल्क, अप्रत्यक्ष कर आणि नार्कोटक्स अकादमी (नासेन) यांच्या  २८ मे २०१८ रोजीच्या अधिसूचनेनुसार वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रॅक्टिशनर्सच्या नाव नोंदणीच्या पुष्टीकरणासाठी १२ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ११ ते १.३० या वेळेत  परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
 
यासंबंधी केंद्रीय वित्त मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रक निर्गमित केल्यानुसार नियम ८३ (२) च्या अधीन जीएसटी नेटवर्कवर नोंदणीकृत झालेले आणि नियम ८३ (१) (ख) च्या अंतर्गत येणारे जीएसटीपी अर्थात जे सेल्स टॅक्स प्रॅक्टिशनर किंवा टॅक्स रिटर्न प्रिपेयरर म्हणून काम केलेले आणि तत्कालीन कायद्यांतर्गत पाच वर्षांच्या कामाचा अनुभव असेलेले प्रॅक्टिशनर यांना ३१ डिसेंबर २०१९ च्या आत परीक्षा देणे आवश्यक आहे. यापूर्वी यासाठी  दि. ३१ ऑक्टोबर २०१८, १७ डिसेंबर २०१८ आणि १४ जून २०१९ रोजी परिक्षांचे आयोजन करण्यात आले होते. अशा प्रॅक्टिशनर्ससाठी पुढील परिक्षा १२ डिसेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
 
परीक्षा संगणकावर घेण्यात येईल. यासाठी जीएसटीपीद्वारे नोंदणीकृत पोर्टलवर नोंदणी करता येऊ शकेल. यावर नासेन आणि सी.बी.आय.सी च्या संकेतस्थळाची लिंक देण्यात आली आहे. १२ डिसेंबर २०१९ च्या परीक्षेसाठी नोंदणी व्हावी यासाठी हे पोर्टल २२ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत खुले राहील. परीक्षार्थींच्या मदतीसाठी या काळात एक मदत केंद्रही सुरु करण्यात येईल व त्याची माहिती नोंदणी पोर्टलवर उपलब्ध करून दिली जाईल. या परीक्षेसाठी परीक्षार्थींनी ५०० रुपयांची परीक्षा फी ऑनलाईन स्वरूपात भरणे आवश्यक आहे.
 
जीएसटी कायदा आणि प्रकिया-वेळ २ तास ३० मिनिट, बहुपर्यायी प्रश्न संख्या १००, भाषा इंग्रजी किंवा हिंदी, गुण २००, पात्रता गुण किमान १००, निगेटिव्ह मार्किंग नाही, याप्रमाणे परीक्षेचे स्वरूप तर केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम २०१७,एकात्मिक वस्तू आणि सेवा कर अधिनियम २०१७, सर्व राज्यांचे वस्तू आणि सेवा कर अधिनियम २०१७, केंद्रशासित प्रदेशातील वस्तू आणि सेवाकर अधिनियम २०१७, वेळोवेळी निर्गमित केलेल्या अधिसूचना, परिपत्रके आणि आदेश याप्रमाणे अभ्यासक्रम राहणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, मोदी यांनी केले अभिनंदन