काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या लोकसभेतील अनुपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राहुल गांधी उपस्थित असते तर त्यांना प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न विचारण्याची संधी मिळाली असती, असे अनुपस्थितीची दखल घेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले.
काँग्रेस खासदार के. सुरेश हे राहुल गांधींच्या जागेवर येऊन शून्य प्रहरात प्रश्न विचारत होते. यावेळी एलईडी स्क्रीनवर राहुल गांधींचे नाव दिसले. त्यामुळे के. सुरेश यांना स्वतःच्या जागेवर जाण्याची सूचना देण्यात आली. राहुल गांधी सभागृहात नसूनही त्यांचे नाव दिसत होते.
ओम बिर्ला म्हणाले, तुमची जागा रिक्त दाखवत आहे. ही राहुल गांधींची जागा आहे. राहुल सध्या सुटीवर आहेत. त्यामुळे तुम्ही तुच्या जागेवर जावे.