बिहारमध्ये एक भीषण रस्ता अपघात झाला आहे . चार भोजपुरी कलाकारांसह नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. कैमूर जिल्ह्यातील मोहनिया पोलीस स्टेशन हद्दीतील देवकाली गावाजवळ हा अपघात झाला.
भरधाव वेगाने येणाऱ्या एका स्कॉर्पिओने आधी दुचाकीस्वाराला धडक दिली आणि नंतर दुसऱ्या लेनमध्ये जाऊन समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली.
स्कॉर्पिओमध्ये आठ जण होते. दुचाकीवर एक व्यक्ती जात होता. या अपघातात सर्वांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत भोजपुरी गायक छोटू पांडे आणि त्याच्या लेखकाचाही मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, भोजपुरी गायक छोटू पांडे संपूर्ण टीमसोबत यूपीला जात होता. यावेळी हा अपघात झाला.
या घटनेत दोन अभिनेत्रींचाही मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावर झालेला हा अपघात इतका भीषण होता की त्याचा आवाज दूरवर गेला आणि काही वेळातच लोकांची गर्दी झाली.
सर्व नऊ जण जागीच ठार झाले. मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध भोजपुरी अभिनेता आणि गायक पुण्यश्लोक छोटू पांडे आणि अभिनेत्री सिमरन श्रीवास्तवसह संपूर्ण टीमचा मृत्यू झाला.
मांगलिक कार्यक्रमात गाण्यासाठी या कलाकारांची टीम यूपीला जाणार होती.
Edited By- Priya Dixit