Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 13 April 2025
webdunia

प्रसिद्ध युट्यूबर मृदुल तिवारीच्या लॅम्बोर्गिनीने कामगारांना चिरडले

Youtuber mridul tiwari lamborghini
, सोमवार, 31 मार्च 2025 (14:57 IST)
प्रसिद्ध युट्यूबर मृदुल तिवारीच्या लॅम्बोर्गिनीने कामगारांना चिरडल्याची घटना रविवारी दुपारी दिल्लीला लागून असलेल्या नोएडा सेक्टर 126 मध्ये घडली आहे. 
 
रविवारी दुपारी काही कामगार दुभाजकावर उभे असताना वेगाने येणारी लॅम्बोर्गिनीकार वाहन चालकाच्या नियंत्रणाच्या बाहेर गेली आणि थेट दुभाजकावर चढली. तिथे उभे असलेल्या दोन कामगारांना कारने तुडवले. या अपघातात एका कामगाराचा पाय मोडला आहे तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. कारचालक पळून जाण्याचा प्रयत्न करत होता पण घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.दीपक नावाचा ब्रोकर मृदुल तिवारींकडून लॅम्बोर्गिनीकार खरेदी करणार होता टेस्ट ड्राइव्ह घेताना हा अपघात घडला. 
 
तपासात दोन्ही कामगार छत्तीसगडचे रहिवासी आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये वाहन चालकाचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले आहे की लॅम्बोर्गिनी कार प्रसिद्ध युट्युबर मृदुल तिवारीच्या नावावर नोंदणीकृत आहे.

मृदुल तिवारी युट्युबवर विनोदी व्हिडीओ बनवतो आणि त्याचे युट्युबवर18.7 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. 
अपघातानंतर पोलिसांनी वाहन चालकाला आणि कारला ताब्यात घेतले आहे. अद्याप वाहन चालकाच्या विरोधात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. तक्रार आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे. 
 
Edited By - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ठाणे: प्रेयसीशी झालेल्या भांडणानंतर १८ वर्षीय तरुणाने केली आत्महत्या