Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 17 April 2025
webdunia

शेतकऱ्यांकडून आज भारत बंदची हाक

Farmers call for India Bandh today
, शुक्रवार, 26 मार्च 2021 (10:59 IST)
कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. देशभरात अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिमाण होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला चार महिने पूर्ण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून भारत बंदची हाक देण्यात आली आहे. 
 
संयुक्त किसान मोर्चाचे नेते दर्शन पाल यांनी आंदोलक शेतकऱ्यांकडून दूध तसंच भाज्यांचा पुरवठाही रोखण्यात येईल असं सांगितलं आहे. दरम्यान किसान मोर्चाने शेतकऱ्यांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं आवाहन केलं असून बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्यास सांगितलं आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या’ गावातील महाराष्ट्र बँक बंद ! कर्मचारी कोरोना बाधित, नागरिकांचा खोळंबा