Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 30 March 2025
webdunia

'त्यांनी साडी नेसण्याऐवजी बर्मुडा घालावा'

'त्यांनी साडी नेसण्याऐवजी बर्मुडा घालावा'
, गुरूवार, 25 मार्च 2021 (11:06 IST)
"प्लास्टर काढलेला असतानाही त्या आता बँडेज लावलेला पाय दाखवत आहेत. त्यांनी साडी नेसली आहे. तरी एक पाय झाकलेला आहे, दुसरा नाही. अशी साडी नेसलेलं मी आजपर्यंत पाहिलं नाही. त्यांना पाय दाखवायचाच असेल तर त्यांनी बर्मुडा घालावा, त्यामुळे पाय व्यवस्थित दिसू शकेल," असं वक्तव्य पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केलं.
 
दिलीप घोष यांनी वरील वक्तव्य करतानाचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. यावेळी दिलीप घोष कोणत्याही व्यक्तीचं नाव घेताना दिसत नाहीत. पण त्यांनी ही टीका मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केल्याचं म्हटलं जात आहे.
 
आता यावरून राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे नेते यावरून आमनेसामने आल्याचं सध्या चित्र आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अधिकाऱ्यांना ओळखण्यात आपण कमी पडलो का? - उद्धव ठाकरे