Publish Date: Thu, 25 Mar 2021 (11:02 IST)
Updated Date: Thu, 25 Mar 2021 (11:03 IST)
फोन टॅप होत असतील, तर कामं कशी करायची, अधिकाऱ्यांवर विश्वास कसा ठेवायचा, अधिकाऱ्यांना ओळखण्यात आपण कमी पडलो का, असे प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहेत.
बुधवारी (24 मार्च) आयोजित मंत्रिमंडळ बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते. यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून होत असलेल्या गंभीर आरोपांवर मंत्रिमंडळाने चर्चा केली.
परमबीर सिंह-अनिल देशमुख प्रकरणासह बदली घोटाळा प्रकरणावरही यावेळी चर्चा झाली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना उघडं पाडलं पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे लढण्याच गरज आहे, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.