Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोर्टात भरदिवसा फायरिंग, वकिलाच्या वेशात आले गँगस्टर, कुख्यात बदमाश गोगी ठार

कोर्टात भरदिवसा फायरिंग, वकिलाच्या वेशात आले गँगस्टर, कुख्यात बदमाश गोगी ठार
, शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021 (15:27 IST)
राजधानी दिल्लीच्या उच्च सुरक्षा असलेल्या रोहिणी न्यायालयात दिवसा उजेडात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात कुख्यात बदमाश गोगी ठार झाला आहे. पोलिसांनीही बदमाशांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देत दोघांना ठार केले. रोहिणी न्यायालयात दोन सशस्त्र बदमाश वकिलांच्या वेशात आले होते आणि यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही. असे म्हटले जात आहे की हे लोक कुख्यात बदमाश गोगीला मारण्यासाठी आले होते. 
 
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोगीवर वकिलाच्या वेशात आलेल्या टिल्लू ताजपुरीया टोळीने हल्ला केला होता. या घटनेमुळे न्यायालयाची सुरक्षा, तपासाची प्रक्रिया यावर प्रश्न निर्माण झाले आहेत. न्यायालयाच्या आवारात अशा घटनेने एक भयानक दृश्य समोर आले आहे.
 
दिल्ली पोलिस रोहिणी न्यायालयात गुंड जितेंद्र मान 'गोगी' संबंधित खटल्याची सुनावणी करण्यासाठी आले होते. या दरम्यान वकिलाच्या ड्रेसमध्ये आलेल्या दोन बदमाशांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी दोन्ही बदमाशांना ठार केले. गोगीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्याचा मृत्यू झाला. जितेंद्र गोगीवर खून आणि दरोड्यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला तिहार तुरुंगात ठेवण्यात आले होते, जिथून त्याला खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले. या दरम्यान, टिल्लू ताजपुरीया टोळीच्या दोन बदमाशांनी, ज्यांच्याशी शत्रुत्व होते, त्यांनी गोळीबार केला, जे वकिलाच्या वेशात होते.
 
या घटनेची माहिती देताना दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना म्हणाले, "गोगीला सुनावणीसाठी नेण्यात आले तेव्हा गोगीवर दोन बदमाशांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी दोन्ही बदमाशांवर गोळीबार केला आणि ते ठार झाले. या दोन बदमाशांपैकी एकावर 50,000 रुपयांचे बक्षीस होते. ही घटना न्यायालयाच्या कक्ष क्रमांक 206 मध्ये घडली, जेव्हा गोगी यांना न्यायाधीशांसमोर हजर केले जाणार होते. अचानक झालेल्या गोळीबारामुळे गोंधळ उडाला. अनेक चेंबरमध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते आणि दिवसाच्या उजेडात गोळीबाराच्या या प्रकारामुळे लोक घाबरून गेले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चुकीचा हेअरकट केल्यामुळे सलूनला 2 कोटींची भरपाई द्यावी लागली