Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

न्यायालयाची दिशाभूल करणारा बाबू नायर टोळीतील कुख्यात गुंड निलेश बसवंत याला अटक

न्यायालयाची दिशाभूल करणारा बाबू नायर टोळीतील कुख्यात गुंड निलेश बसवंत याला अटक
, बुधवार, 31 मार्च 2021 (22:39 IST)
मोकाच्या कारवाईतून जामीन मिळावा यासाठी आजापणाचे बनावट प्रमाणपत्र सादर करुन न्यायालयाची दिशाभूल करणारा बाबू नायर टोळीतील कुख्यात गुंड निलेश बसवंत याला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट एकने हि कारवाई केली.निलेश श्रीनिवास बसवंत (वय 32, रा. अप्पर इंदिरानगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या कुख्यात गुंडांचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2015 मध्ये बाबु नायर याच्यासह त्याचे साथीदार निलेश बसवंत, अमोल बसवंत, नितेश बसवंत, दिपक कदम व दत्ता माने यांच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच, त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. गुंड निलेश बसवंत याला ऑगस्ट 2016 मध्ये अटक करण्यात आली, त्यानंतर ऑक्टोबर 2020 पर्यंत तो येरवडा मध्यवर्ती कारागृहात होता.
कारागृहात असताना निलेश बसवंत याने आपल्याला गंभीर आजार असल्याचे सांगून त्याबाबत बनावट प्रमाणपत्रे तयार केली व न्यालयाला सादर केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपचारासाठी त्याला पॅरोलवर सोडण्यात आले. चौकशीअंती त्याने सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. साताऱ्यातील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर, शेंद्रे, सातारा या हॉस्पिटलमधून ही प्रमाणपत्रे तयार केल्याचे निदर्शनास आले व याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, निलेश बसवंत आपल्या घरच्यांना भेटण्यासाठी खेडशिवापूर येथे येणार असल्याची माहिती युनिट एकच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या भागात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. गुंड निलेश बसवंत बाबू नायर टोळीचा सक्रिय सदस्य असून, त्याच्यावर खुन, खुनाचा प्रयत्न, मारहाण, जमीन बळकावणे, अग्निशस्त्र बाळगणे असे 12 गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर दोन वेळा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गुंड निलेश बसवंत याला पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बाळासाहेब ठाकरे स्मारक भूमिपूजन सोहळा संपन्न