बेंगळुरूनंतर आता गुजरातच्या अहमदाबादमध्ये ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV)चे एक प्रकरण समोर आले आहे. अहमदाबादच्या चांदखेडा भागात एका 2 महिन्यांच्या मुलाला या विषाणूची लागण लागली आहे. या बाळावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. मुलाला उपचारासाठी कुटुंब राजस्थानमधील डुंगरपूरहून उपचारासाठी अहमदाबादला घेऊन आले.मुलावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे. अलीकडे चीनमध्ये त्याच्या वाढत्या केसेसमुळे चिंतेचे वातावरण आहे.
ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे ज्यामुळे सर्दीसारखी लक्षणे दिसून येतात. एचएमपीव्ही हा आरएनए विषाणू आहे जो पॅरामिक्सोव्हिरिडे कुटुंबाचा सदस्य आहे. याचा प्रामुख्याने श्वसनसंस्थेवर परिणाम होतो आणि सामान्यत: सर्दीसारखी लक्षणे उद्भवतात, जसे की खोकला, घरघर, नाक वाहणे किंवा घसा खवखवणे. थंडीमध्ये त्याचा धोका वाढतो.
बेंगळुरू मध्ये या विषाणूची लागण लागलेले दोन प्रकरण आढळले दोन्ही प्रकरणांमध्ये ब्रॉंकोप्न्यूमोनिया, न्यूमोनियाचा वैद्यकीय इतिहास होता. तीन महिन्यांच्या बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आले आहे. तर 8 महिन्याच्या बाळाला रविवारी या विषाणूची लागण लागल्याचे समोर आले आहे.
भारत सरकारने जनतेला घाबरू नका असे आवाहन केले आहे.
Edited By - Priya Dixit