Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता दिवस आले उडणाऱ्या कारमध्ये फिरण्याचे

आता दिवस आले उडणाऱ्या कारमध्ये फिरण्याचे
, सोमवार, 28 मे 2018 (14:39 IST)
कानपूरच्या आयआयटीयन्स आता उडणारी कार तयार करत आहेत. ही कार विमानाप्रमाणे थेट टेक ऑफ आणि लँडिंग करणार आहे. ही कार कुठेही उतरवता येणे शक्य असल्याने रनवेचीही गरज नसेल, असे या तज्ज्ञ मंडळींनी सांगितले आहे. या कारचा उपयोग टॅक्सी म्हणूनही करता येणार आहे. यास एअर टॅक्सी असे नाव देण्यात आले आहे.
 

कानपूर आयआयटीने या कारची निर्मिती करण्यासाठी विटॉल एविअॅशन कंपनीबरोबर १५ कोटींचा करार केला आहे. या कराराप्रमाणे एअरोस्पेस इंजिनिअरिंग विभाग पाच वर्षांच्या आत ८०० ते १००० किलोग्रॅमचे प्रोटोटाईप मॉडेल तयार करणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मुंबईत या कारची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी मुंबईत कारखानाही उभारण्यात येणार आहे. मेक इन इंडियाच्या अंतर्गत या कारची निर्मिती करण्यात येत आहे. ही कार टू सीटर असून ती किमान दहा हजार फूट व कमाल १२ हजार फूट उंचावर उडू शकणार आहे. वीज व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या कारची निर्मिती करण्यात येत आहे. ९० ते १०० मीटर प्रतिसेकंद असा या कारचा वेग असणार आहे. विशेष म्हणजे हवेत उडणाऱ्या या कारमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी खास सोय करण्यात येणार आहे.

आयआयटी कानपूरने १० मे रोजी २० किलोग्रॉम वजनाच्या मानवरहित उडत्या कारची यशस्वी चाचणी केली होती. २० मिनिटं ही कार हवेत उडत होती. यासाठी लार्सन अँड ट्युब्रो कंपनीने मदत केली होती, असे आयआयटी कानपूरच्या एअरोस्पेस विभागाचे प्रमुख प्राध्यापक ए.के. घोष यांनी सांगितले आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रणवदा आरएसएसच्या वर्गाला संबोधित करणार