Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सिक्कीम जगातील पहिले Organic State

सिक्कीम जगातील पहिले Organic State
, बुधवार, 17 ऑक्टोबर 2018 (09:10 IST)
संयुक्त राष्ट्रांनी सिक्कीम राज्याला जगातलं पहिलं Organic State हा बहुमान प्रदान केला आहे. राज्यभरात केल्या जाणाऱ्या शेतीमध्ये सेंद्रीय पद्धतीचा अवलंब करुन पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक पाऊल उचलल्याने सिक्कीम राज्याला हा पुरस्कार दिला गेला आहे. 25 विविध देशांमधून 51 राज्यांनी या पुरस्कारासाठी अर्ज केला होता, ज्यामध्ये सिक्कीमने बाजी मारली आहे. 
 
ब्राझील, डेन्मार्क आणि इक्वेडोर यांना रौप्य पदकाचा मान मिळाला आहे. सिक्कीम राज्याने अवलंबलेल्या धोरणामुळे राज्यातील तब्बल 66 हजार शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारलं असून, राज्याच्या भेट देणाऱ्या पर्यटकांमध्येही वाढ झालेली आहे. इतर देशांसाठी सिक्कीमने घालून दिलेला पायंडा हा आदर्शवत असल्याचंही संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'ती' वादग्रस्त दोन पुस्तके रद्द