काळ कधी कोणावर झड़प घालेल हे कोणीच सांगू शकत नाही. मध्य प्रदेशातील श्योपूरमध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे . येथे लग्नातील आनंद काही क्षणातच शोकात बदलला जेव्हा वराला घोड्यावर बसताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला.
स्टेजसमोरच वराच्या मृत्यूचा व्हिडिओ समोर आला आहे आणि तो पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. या हृदयद्रावक घटनेनंतर लग्नातील आनंदाचे रूपांतर शोकात झाले.प्रदीप जाट यांचे लग्न शुक्रवारी रात्री शेवपूर शहरातील एका मेरेज गार्डन मध्ये होते.
वर म्हणून, प्रदीप वधूला घेऊन जाण्यासाठी लग्नाच्या वर्हाडी सोबत वधूला आपल्या सोबत नेण्यासाठी लग्नाच्या मंडपात पोहोचला. प्रदीप घोडीवर बसून स्टेज कड़े जाताना खाली पड़ला अचानक बेशुद्ध झाला.
घोड़ेवाला वराची काळजी घेत होता. जवळच्या लोकांनी प्रदीपला बेशुद्ध अवस्थेत पाहून गोंधळ उडाला
लग्नात उपस्थित असलेल्या लोकांनी बेशुद्ध वर प्रदीपला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेले पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. इथे वधू पूर्णपणे सजली होती आणि वराची वाट पाहत होती आणि वराच्या मृत्यूची बातमी मिळताच तिच्यावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला. आणि आनंदाचा क्षण दुःखात बदलला.