Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

1 कोटी रुपयांचे मद्य गुजरातमध्ये नष्ट केले

1 कोटी रुपयांचे मद्य गुजरातमध्ये नष्ट केले
अहमदाबाद (गुजरात) , गुरूवार, 24 मे 2018 (08:49 IST)
गुजरात पोलीसांनी सुमारे 1 कोटी रुपये किमतीचे मद्य नष्ट केले. अहमदाबादच्या रामोल भागात हे मद्य रोड रोलरखाली नष्ट करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. गुजरातमध्ये मद्याची निर्मिती, साठा, विक्री आणि मद्यपान यावर संपूर्ण बंदी आहे.
 
1960 साली मुंबई राज्यापासून वेगळे होऊन गुजरात राज्याची स्थापना झाल्यापासून गुजरातमध्ये मद्याची निर्मिती, साठा, विक्री आणि मद्यपान यावर संपूर्ण बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र बंदी घालण्यात आलेली असली, तरी चोरट्या मद्याच्या धंद्यावर मात्र पूर्णपणे आळा घालणे सरकारला शक्‍य झालेले नाही. जप्त करण्यात आलेला चोरट्या मद्याचा साठा अशा प्रकारे नष्ट करण्यात येतो.
 
आंध्र प्रदेश, तामिळनाडू, हरियाणा, मिझोरम आणि मणिपूर या राज्यांमध्ये दारूबंदी कायद्याचा प्रयोग करून पाहण्यात आला होता. मात्र नंतर तो रद्द करण्यात आला.
 
बिहार हे संपूर्ण दारूबंदी करणारे देशातील चौथे राज्य आहे. नितीश कुमार सरकारने सन 2016 मध्ये प्रथम देशी मद्यांवर आणि नंतर सर्वच प्रकारच्या मद्यांवर बंदी घातलेली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बी डी'व्हिलियर्सने क्रिकेटला अलविदा