rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुजरात, हिमाचलचला आज फैसला

गुजरात
काँग्रेस व भारतीय जनता पक्षाने प्रतिष्ठेची बनविलेल्या गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल सोमवारी लागणार आहे. एक्झिट पोलमध्ये दोन्ही राज्यांमध्ये भाजपची सराशी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असला तरी दोन्ही पक्षांनी विजयाचे दावे केले आहेत. त्यामुळे उद्याच्या मतमोजणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
 
दरम्यान, भाजपने ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी केला आहे. तर एक्झिट पोलवर विश्वास नसल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. या निवडणुका 2019 च्या लोकसभेची सेमी फायनल असल्याचे समजण्यात येत आहे. या शिवाय गुजरातचे निकाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांवर शिक्कामोर्तब करणारे असतील असेही समजण्यात येते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोळसा घोटाळा : मधू कोडाना ३ वर्ष तुरुंगवास, २५ लाखांचा दंड