Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुजरात : पहिल्या टप्प्यातील मतदान

गुजरात : पहिल्या टप्प्यातील मतदान
, शनिवार, 9 डिसेंबर 2017 (08:57 IST)
गुजरात विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान शनिवारी होत असून त्यात गेली २२ वर्षे सत्तेत असलेला भाजप आणि सरकारविरोधी असंतोषाला बळ देत पाटीदार, ओबीसी आणि दलित समाजाच्या युवा नेतृत्वाशी संधान बांधणारी काँग्रेस  या दोन पक्षांत निर्णायक लढतीची पहिली फेरी रंगणार आहे. 
 
एका विधानसभा मतदारसंघासाठी पाच ते सहा हजार कार्यकर्त्यांची फळी भाजपने उभी केली आहे. त्या उलट प्राथमिक स्तरावर कार्यकर्त्यांची फळी मजबूत नसल्याने कॉंग्रेसचे आव्हान वाढले आहे.तर  भाजप एक वर्षांपासून बूथ मॅनेजमेंटवर काम करत आहे. कच्छ, दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रच्या २४,६८९ बूथवर प्रति बूथच्या हिशेबाने २० तरुणांची नियुक्ती भाजपाने केली आहे. बूथ व्यवस्थापनात भाजपने काँग्रेसला मागे सोडले आहे. भाजपसह आरएसएस व अन्य सहयोगी संघटनांच्या तरुणांची फौजच तयार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आधार – पॅन कार्ड लिंक करण्यासाठी मुदतवाढ