राजधानीसह एनसीआरमध्ये आजही पावसाची शक्यता वर्वतवण्यात आली आहे. हवामानविभागाने आज राजधानी दिल्लीसाठी यलो अलर्ट घोषित केला आहे. रविवारीही दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार पाऊस झाला. पावसामुळे अनेक भागात पाणी साचण्याची समस्या निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले.
दिल्लीशिवाय आज अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासांत दिल्ली, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशचा काही भाग, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, ईशान्य भारत, केरळ, तमिळ नाडू आणि दक्षिण आतील कर्नाटकात हलका ते मध्यम पाऊस पडेल.
तसेच गंगा किनारी पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओरिसा, किनारी आंध्र प्रदेश, तेलंगणा, विदर्भ, रायलसीमा, दक्षिण आतील कर्नाटक, गोवा, किनारी कर्नाटक, किनारपट्टी महाराष्ट्र, पूर्व गुजरात आणि अंदमानमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. निकोबार बेटांवर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.