हवामान विभागाने महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात रेड अलर्ट घोषित केला आहे. तसेच पुढील 3 दिवसांत हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
देशभरातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तर
या दरम्यान, हवामान विभागाने अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला असून रेड अलर्ट घोषित केला आहे. यासोबतच, हवामान विभागाने म्हटले आहे की आज 7 ऑगस्ट राष्ट्रीय राजधानीत वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. याबाबत हवामान विभागाने यलो अलर्ट घोषित केला आहे.
हवामान विभागाने दिल्लीमध्ये पुढील दोन दिवस शहरात हलक्या ते मध्यम पावसाचा 'यलो अलर्ट' घोषित केला आहे. तसेच बुधवारी गडगडाटासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, रेड अलर्ट घोषित-
हवामान खात्याने हिमाचल प्रदेशात पुढील 3 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून आज 7 ऑगस्टसाठी ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. यासोबतच हवामान विभागाने महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात पावसाबाबत रेड अलर्ट घोषित केला आहे. तसेच केरळमध्येही मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.