Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 23 March 2025
webdunia

काश्मिर एनएसजी कमांडोंचे जोरदार प्रशिक्षण लवकरच मोठी कारवाई

काश्मिर एनएसजी कमांडोंचे जोरदार प्रशिक्षण लवकरच मोठी कारवाई
, शुक्रवार, 22 जून 2018 (08:30 IST)
बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या तळावर श्रीनगर येथे एनएसजी कमांडोंचे जोरदार प्रशिक्षण सुरु आहे. हे लवकरच काश्मीर खोऱ्यात एनएसजी कमांडो तैनात होणार आहेत. या कंमांडोची ओळख 'ब्लॅक कॅट कमांडो' अशी  आहे. भारताची एलिट कमांडो फोर्स म्हणून ती ओळखली जाते. या फोर्सची ओळख काळ्या रंगाचा युनिफॉर्म (ब्लॅक युनिफॉर्म) आहे. एनएसजीचे जवळपास दोन डझन स्नायपर्स मागच्या दोन आठवडयांपासून जोरदार सराव करत आहेत. त्यामुळे काश्मिर   खोऱ्यात मोठी दहशत आतंकवाद्यामध्ये निर्माण झाली आहे. जम्मू-काश्मीरमधील मुफ्ती सरकारचा पाठिंबा भाजपाने काढून घेतल्यानंतर राज्यातील सरकार पडलं असून जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली काश्मीरमध्ये एनएसजी कमांडो पाठविण्याचा निर्णय आधीच केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला होता. त्यामुळे आधीपासूनच सरकार मोठा निर्णय घेणार हे उघड होते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

व्यक्त व्हा, महाराष्ट्रातील लोक ठाम भूमिका घेताना दिसत नाहीत - गुलजार