Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हिट अँड रन प्रकरण:खासदाराच्या मुलीच्या आलिशान कार ने एकाला चिरडले, मृत्यू

हिट अँड रन प्रकरण:खासदाराच्या मुलीच्या आलिशान कार ने एकाला चिरडले, मृत्यू
, बुधवार, 19 जून 2024 (10:04 IST)
वायएसआर काँग्रेस पार्टी (वायएसआरसीपी) राज्यसभा खासदार बिदा मस्तान राव यांच्या मुलीचे नाव हिट अँड रन प्रकरणात समोर येत आहे.सोमवारी रात्री चेन्नईत राज्यसभा खासदारांच्या मुलीने एका व्यक्तीला आपल्या आलिशान बीएमडब्ल्यू कारने फूटपाथवर झोपलेल्या एका व्यक्तीला चिरडल्याचा आरोप आहे.  सूर्या नावाच्या 21 वर्षीय तरुणाला  गंभीर दुखापत झाली होती, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी खासदाराच्या मुलीला अटक करण्यात आली मात्र नंतर तिला जामीन मिळाला.
 
वेगवान बीएमडब्ल्यू कारने फूटपाथवर झोपलेल्या एका व्यक्तीला चिरडले, परिणामी त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, आरोपी महिला चालक आणि तिच्यासोबत असलेली दुसरी महिला घटनेनंतर लगेचच घटनास्थळावरून पळून गेली.

मिळालेल्या माहितीनुसार, वायएसआर काँग्रेस पार्टी (वायएसआरसीपी) राज्यसभा खासदार बिदा मस्तान राव यांच्या मुलीने सोमवारी रात्री चेन्नईमध्ये तिच्या बीएमडब्ल्यू कारने एका व्यक्तीला चिरडले. या अपघातात त्या तरुणाचा मृत्यू झाला.

महिला घटनेनंतर लगेचच घटनास्थळावरून पळून गेली.मात्र तिची मैत्रिण गाडीतून खाली उतरली आणि अपघातानंतर जमलेल्या लोकांशी वाद घालू लागली. मग तीही काही वेळाने तिथून निघून गेली. अड्यार ट्रॅफिक पोलिसांनी आयपीसी कलम 304A (निष्काळजीपणामुळे मृत्यू) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, 
सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज पाहिल्यानंतर, पोलिसांना आढळले की कार बीएमआर (बीडा मस्तान राव) ग्रुपची आहे आणि ती पुद्दुचेरीमध्ये नोंदणीकृत आहे. त्यानंतर महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला.तिला अटक केली मात्र तिला  पोलीस ठाण्यातून जामीन मिळाला.
 
Edited by - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राहुल गांधींनी रायबरेली मतदारसंघ स्वतःकडे का ठेवला आणि वायनाडमधून प्रियंका का लढत आहेत?