पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील काही दिवसांमध्ये भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील आठ राज्यांना अम्फान चक्रीवादळाचा फटका बसू शकतो असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
आज अंदमान-निकोबारसहीत लक्षद्वीपमध्ये चक्रवादळासहीत जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. याचबरोबर ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील काही भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळण्याचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तयार झालेल्या अम्फान चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका पूर्वे कडील राज्यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी दक्षिण, पश्चिम आणि उत्तरेकडील काही भागांमध्ये जोरदार ते मध्य स्वरुपाचा पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. काही भागामध्ये धुळीची वादळेही उठतील असे अंदाज वर्तवण्यात येत आहे.